‘इरसाल कोकणरंग’ पुस्तकाचा रविवारी प्रकाशन सोहळा

चिपळूण : श्री क्षेत्र परशुराम येथील लेखक यशवंत उर्फ राजा बर्वे लिखित ‘इरसाल कोकणरंग’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी (३१ मे) सायंकाळी ६ वाजता चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात होणार आहे.

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रवचनकार धनंजय चितळे भूषविणार असून, यावेळी ज्येष्ठ पत्रकार शिरीष दामले हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘इरसाल कोकणरंग’ या पुस्तकामध्ये लेखक राजा बर्वे यांनी आपल्या आयुष्यात भेटलेल्या कोकणातील चाळीसहून अधिक वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्त्वांचे व्यक्तीचित्रण केले आहे. या पुस्तकातून जुन्या कोकणातील निसर्ग, प्रथा-परंपरा, लोकांचे राहणीमान, आहार-विहार आणि सामाजिक जीवनाचेही जिवंत चित्र उभे राहते.

या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष अरुण इंगवले, सहकार्यवाह विनायक ओक आणि प्रकाश देशपांडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button