
रायगडातून सासुरवाडीला येणार्या दुचाकीस्वार तरूणाचा अपघाती मृत्यू
राजापूर तालुक्यातील ताम्हाणे बनाचा नाळ येथे झालेल्या भीषण दुचाकी अपघातात सिध्देश शिवाजी भोस्तेकर (२९, रा.. माणगावा रायगड, सध्या रा. सांताक्रुज, मुंबई) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. सोमवाली दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास ताम्हाणे रस्त्यावर हा अपघात घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिध्देश भोस्तेकर हा माणगाव येथून दुचाकीवरून ताम्हाणे येथील आपल्या सासुरवाडीला येत होता. ताम्हाण रोडवरील बलाचा माळ परिसरात दुचाकीवरील ताबा सुटल्याने त्याची दुचाकी समोरील चिरेबंदी कंपाऊंडच्या भिंतीवर जोरात आदळली. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून मदतकार्य सुरू केले. तसेच राजापूर पोलीसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक अमित यादव, उपनिरीक्षक सुधीर उबाळे तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक सुधीर उबाळे करीत आहेत.www.konkantoday.com




