
शेअर ट्रेडिंगच्या आमिषाने तरुणीची ऑनलाईन फसवणूक, चिपळूणमधील घटना
इंस्टाग्रामवरून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवित एका तरुणीची 77 हजार 854 रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना चिपळूण शहरातील शिवाजीनगर परिसरात घडली आहे. या प्रकरणी अज्ञात आराेपीविराेधात चिपळूण पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. 9 मे 2026 राेजी सकाळी 10.30 ते सायंकाळी 6.32 या कालावधीत घडली असून याप्रकरणी संताेष दत्ताराम जाधव (वय 51, रा. शिवाजीनगर, चिपळूण) यांनी िफर्याद दिली आहे. िफर्यादी यांच्या मुलीला आकाश नाव सांगणाèया एका अनाेळखी व्यक्तीने इंस्टाग्राम अकाऊंटवरून संपर्क साधला. संबंधिताने शेअर ट्रेडिंगमध्ये माेठा ना मिळवून देण्याचे आमिष दाखवले.
त्यांना वाॅटसअॅपद्वारे वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ऑनलाईन रक्कम भरण्यास सांगितले. आराेपीच्या सांगण्यावरून संबंधित तरुणीने टप्प्याटप्प्याने एकूण 77 हजार 854 रुपये विविध खात्यांमध्ये ऑनलाईन गुंतवणूक केली. मात्र गुंतवलेली रक्कम परत मिळाली नाही तसेच रक्कम शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवण्यातही आलेली नसल्याचे नंतर निदर्शनास आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुंबीयांनी पाेलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी चिपळूण पाेलीस ठाण्यात माहिती दाखल करण्यात आला असून पुढील तपास पाेलीस करीत आहेत.www.konkantoday.com




