सावित्री खाडीत अवैध वाळू साठा


सावित्री नदी बाणकोट खाडी परिसरात शासनाची परवानगी न घेता अवैधरित्या वाळू साठवल्याप्रकरणी कुशल अशोक सुळे (४०, रा. उमरोली, ता. मंडणगड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. वेसवी मंडल अधिकार्‍यांनी उमरोली गावाजवळील बाणकोट खाडी. किनार्‍यालगत ही कारवाई केली. अवैध वाळू साठ्याची अंदाजे किंमत १ लाख ७०० रुपये असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी बाणकोटचे मंडल अधिकारी संतोष गायकवाड यांनी फिर्याद दिली. त्यानुसार कुशल सुळे याने आपल्या जागेत शासनाची पूर्वपरवानगी न घेता सुमारे १०.०७ ब्रास अवैध वाळू साठवून शासन महसुलाचे नुकसान केल्याप्रकरणी बाणकोट पोलिसांत गुन्हा दाखल झाला.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button