
दापोली तालुक्यातील टाळसुरे येथे बंद घरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला
दापोली तालुक्यातील टाळसुरे संतोषीमाता नगर येथे एका बंद घरात ७६ वर्षीय वृध्देचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुवर्णा महादेव रिसबूड असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून दापोली पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. सुवर्णा रिसबूड या संतोषीमाता नगर येथील आपल्या घरात एकट्याच राहात होत्या.
www.konkantoday.com




