
गावठी बॉम्बला हाताचा धक्का लागून महिलेच्या हाताची पाचही बोटे तुटल्याने महिला गंभीर जखमी
रत्नागिरी तालुक्यातील जांभारी येथे घराच्या कुंपणासाठी बांबू तोडत असताना जमिनीवरील गावठी बॉम्बला हाताचा धक्का लागून महिलेच्या डाव्या हाताची पाचही बोटे तूटून ती गंभीर जखमी झाली.घटना मंगळवारी सकाळी 6.45 वा.सुमारास घडली आहे.
रेश्मा प्रसाद सुर्वे (47,रा.जांभारी,रत्नागिरी) असे बॉम्बच्या स्फोटात गंभिर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगळवारी सकाळी 6.45 वा.सुमारास ती पती प्रसाद सुर्वे सोबत घराच्या मागील बाजूस भूताचा बंगला या ठिकाणी घराच्या कुंपणासाठी बांबू तोडून आणण्यासाठी गेली होती. बांबू तोडून झाल्यानंतर काही वेळाने तिचा पती प्रसाद याला तहान लागल्यामुळे तो घरात पाणी पिण्यासाठी गेला होता. दरम्यान, रेश्मा सुर्वे तोडून जमिनीवर ठेवलेले बांबू उचलत असताना अचानकपणे मोठा स्फोट होउन तिच्या हाताची पाचही बोटे तूटून ती गंभिर जखमी झाली. तेवढ्यात स्फोटाचा आवाज एकून प्रसाद सुर्वे धावत त्याठिकाणी पोहचला असता पत्नीच्या हाताची अवस्था पाहून तो घाबरुन गेला. त्याने आपल्या मित्रांना तातडीने बोलावून घेत त्या जागेची पाहणी केली असता त्यांना जंगली जनावरांना आणि पक्ष्यांना मारण्यासाठी ठेवण्यात आलेले अनेक गावठी हात बॉम्ब त्याठिकाणी पसरुन ठेवलेले दिसून आले. प्रसाद सुर्वेने मित्रांच्या मदतीने पत्नीला तातडीने जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले




