
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे रेल्वेमधून पडून तरुणाचा मृत्यू
चिपळूण तालुक्यातील कळंबस्ते येथे रेल्वेमधून पडून १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ओंकार विजय गुरव (१९, संगमेश्वर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओंकार व त्याची बहिण असे दोघेजण गावी जाण्यासाठी रेल्वेमधून प्रवास करत होते. असे असताना त्याचा तोल गेल्याने तो रेल्वे मधून खाली कोसळला. यात तो गंभीररित्या जखमी झाल्याने अखेर त्याचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com




