रत्नागिरीत झालेल्या वादळाने नारळ संशोधन केंद्रात पडझड; दीड लाखाची हानी


रत्नागिरी जिल्ह्यात ९ मे रोजी संध्याकाळी आलेल्या वादळाने भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्र परिसरातील अनेक झाडे उन्मळून पडली असून विविध पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. तसेच कार्यालयाजवळील वीजखांब कोसळल्याने मुख्य कार्यालयाचा ४ दिवस तर प्रयोगशाळेचा वीज पुरवठा अद्याप बंद आहे त्यामुळे संशोधन व दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला आहे
शहरालगतच्या भाट्ये येथे असलेले नारळ संशोधन केंद्र हे कोकणातील नारळ, सुपारी, व इतर बागायती पिकांवरील संशोधनासाठी महत्वाचे के आहे. शनिवारी झालेल्या वादळाचा या विभागाला चांगलाच फटका बसला आहे. भाट्ये संशोधन केंद्रातील नारळाच्या विविध वाणांच्या संग्रहातील अनेक माड मोडून पडले तसेच मसाला पिके, सुपारी, केळी आणि कोकम लागवडीचेही नुकसान झाले असल्याची माहिती केंद्र प्रशासनाने दिली, यामध्ये १० माड, ५ पोफळी, २. कोकमची मोठी झाडे, ३० केळीची झाडे, शेडनेट मंडप तसेच वीज खांब कोसळून जैविक कीड नियंत्रण प्रयोगशाळेचा वीज पुरवठा खंडित झाला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button