पुण्यातील रुग्णालयात ‘बॉम्ब’ ठेवणारा संशयित अटकेत; आरोपीचे ‘आरोग्य’ कनेक्शन


पुण्यातील हडपसरमधील रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवणारा संशियत आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.बुधवारी संध्याकाळी हडपसरमधील रूग्णालयात टायमर बॉम्ब आढळला होता, त्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. सात तासांचा टायमर असलेल्या बॉम्ब समोर पाहिल्यानंतर सर्वांनाचा धक्का बसला होता. पोलिसांनी हा जिवंत बॉम्ब निकामी केला. पोलिसांकडून या प्रकरणाचा कसून तपास केला जात आहे.

पोलिसांनी रूग्णालय आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले असताना धक्कादायक माहिती समोर आली. एका दुचाकीवर येणाऱ्या व्यक्तीने बॉम्ब ठेवल्याचे समजले होते. त्यानंतर पोलिसांनी कसून तपास करत काही तासांच्या आत संशयित आरोपील्या बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांकडून त्या व्यक्तीची विचारपूस केली जात आहे.आरोपी हा आरोग्य विभागाशी संबंधित असणारा व्यक्ती असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. एटीएस आणि पुणे पोलिसांकडून संयुक्तिक तपास सुरू आहे. जिलेटिनच्या कांड्या कुठून आणल्या होत्या? बॉम्ब का ठेवला? याचाही पोलिसांकडून तपास केला जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button