
रत्नागिरी आणि डहाणू किनारपट्टीवरून समुद्रात सोडण्यात आलेल्या ’धवल लक्ष्मीने ३,५०० किमींचा समुद्री प्रवास करत गाठले ओमान
ऑलिव्ह रिडले कासव संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणारी एक अनोखी घटना महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर समोर आली आहे. रत्नागिरी आणि डहाणू किनारपट्टीवरून समुद्रात सोडण्यात आलेल्या ’धवल लक्ष्मी’ या ऑलिव्ह रिडले कासवाने तब्बल ३,५०० किलोमीटरचा प्रवास करत थेट ओमानच्या किनार्यापर्यंत मजल मारली असून, या प्रवासाने समुद्री जीवशास्त्रज्ञ आणि संशोधकांनाही आश्चर्याचा धक्का दिला आहे. वन्यजीव संवर्धन आणि संशोधन प्रकल्पांतर्गत या कासवाला सॅटेलाइट टॅग लावून समुद्रात सोडण्यात आले होते.
www.konkantoday.com



