
खेड तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा
तीन दिवसांत ९ लाख ५४ हजार ३०० रुपयांचे नुकसान
खेड : तालुक्यात अवकाळी पावसाच्या तडाख्याने ७, ८ व ९ मे या तीन दिवसात ९ लाख ५४ हजार ३०० रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
तालुक्यात अंशत घरांचे नुकसान झाले असून ७ मे रोजी वरवली येथील सुनीता श्रीपत गोगावले (१२०० रुपी), ९ मे रोजी घेरापालगड येथील सुरेखा प्रदीप कदम (१० हजार), निर्मला महादेव पवार ( ९ हजार ५००), मेघा महेंद्र कदम (५ हजार), श्रीधर काशिराम कदम (१७ हजार), प्रवीण पांडुरंग मोरे (१० हजार), धामणी येथील शुभांगी सुभाष शिंदे (२० हजार), दिलीप लक्ष्मण खताते (१० हजार), सुनील कृष्णा सुर्वे (२० हजार), सुनील शांताराम खताते (२० हजार), सुनीता राजाराम खताते (६ हजार), पांडुरंग गणपत सावरटकर (९० हजार), विष्णू महादेव कादारे (५ हजार), राहुल सयाजी कदम (२७ हजार), सुशिला केरु मोरे (८६ हजार), कृष्णा केशव पवार ऊर्फ गुजर (४० हजार), मनोहर भिकाजी गोगावले (३० हजार), जयराम धोंडू कदम (२० हजार), आत्माराम काशिराम गोगावले (५० हजार), दमाराम रामचंद्र खताते (१० हजार ६००), विलास धोंडू कदम (१५ हजार), सीताबाई भागोजी गोगावले (१० हजार), शिवाजी विठोबा कदम (१० हजार), गणेश विठोबा कदम (४७ हजार), मोहन भिकाजी गोगावले (२५ हजार), मंगेश भिकाजी गोगावले (४० हजार), सहदेव शिवराम गोगावले (२५ हजार), प्रदीप काशिनाथ सावरटकर (६० हजार), नवनाथ लक्ष्मण कदम (२५ हजार), शोभा पांडुरंग मोरे (२३ हजार), सुधीर सखाराम मोरे (२२ हजार), आणि उमेश सुभाष शिंदे (१२ हजार) असे एकूण ९ लाख ५४ कार ३०० रुपयांचे नुकसान झाले आहे.
याव्यतिरिक्त ८ मे रोजी असगणी मोहल्ला येथील इब्राहिम इस्माईल बंदरकर तसेच ९ मे रोजी धामणी येथील दत्त मंदिर, धामणी कदमवाडी येथील अंगणवाडी आणि धामणी येथील कुलस्वामी मंदिर यांचेही नुकसान झाले आहे.
In




