रत्नागिरी शहराजवळील चर्मालय ते कोकणनगर दरम्यानच्या अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोझर फिरला


गेल्या अनेक दिवस चर्चेत असलेल्या
रत्नागिरी शहराजवळ चर्मालय ते कोकणनगर दरम्यानची बहुचर्चित अतिक्रमण हटाव मोहीम बुधवार सकाळपासून अखेर सुरू झाली नगरपालिकेच्या पथकाने बुधवारी सकाळीच जेसीबीसह घटनास्थळी धडक देत या भागातील अनधिकृत बांधकामे आणि दुकाने जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली आहे. यावेळी 80 पेक्षा अधिक बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
चर्मालय ते कोकणनगर या वर्दळीच्या आणि मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत दुकाने आणि पक्की बांधकामे उभी राहिली होती. या वाढत्या अतिक्रमणामुळे रस्त्याचे रुंदीकरण करण्याच्या प्रक्रियेत मोठ्या अडचणी येत होत्या. तसेच, शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असणारे ११ केव्हीची भूमिगत उच्चदाब विद्युत वाहिनी टाकण्याचे कामही याच अतिक्रमणांमुळे अनेक दिवसांपासून खोळंबले होते

ही धडक मोहीम काही दिवसांपूर्वीच राबवण्यात येणार होती. मात्र, मागील वेळी सणासुदीचे दिवस पाहता प्रशासनाने ही कारवाई तात्पुरती पुढे ढकलली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button