
देवळे फाट्यावर उभ्या रिक्षाला धडक देऊन रिक्षा चालकाच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या व फरार झालेल्या वाहन चालकाला आंबा येथे देवरुख पोलिसांनी पकडले
रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर देवळे फाट्यावर उभ्या रिक्षाला मागून धडक देऊन रिक्षा चालकाच्या मृत्यूस जबाबदार असलेला फरार वाहन चालकाला देवरुख व साखरपा पोलीस यंत्रणेने अवघ्या काही तासात आंबा येथे पकडले
देवळे फाट्यावर पॅसेंजर ची वाट बघत असलेल्या रिक्षाचालक विजय पांडुरंग कांबळे (वय 62.) याच्या उभ्या असलेल्या रिक्षाला मागून धडक दिली होती त्यामध्ये रिक्षाचालक विजय कांबळे याचा मृत्यू झाला होता धडक दिल्यानंतर आरोपी वाहन घेऊन फरार झाला होता घटना स्थळावरून फरार झालेला वाहन चालक व वाहन MH 09 -GA -6886 यांना देवरुख पोलिसांनी सीसीटीव्ही च्या माध्यमातून नाकाबंदी करून आंबा घाट येथे आरोपीच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवलेदेवरुख पोलीस निरीक्षक उदय झावरे साखरपा दुरक्षेत्राचे पोलीस निरीक्षक साखरपा प्रमोद वाघाटे सहायक पोलीस फौजदार शांताराम पंदेरे पोलीस हवालदार सचिन कामेरकर पोलीस हवालदार सचिन पवार यांनी या कामी मोलाची कामगिरी पार पडली




