
ठरलं! विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध; पाहा उमेदवारांची संपूर्ण यादी!
महाराष्ट्र विधानपरिषदेची निवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध होणार हे आता स्पष्ट झाले आहे. विधानपरिषदेरच्या रिक्त झालेल्या नऊ जागा आणि एका जागेवर पोटनिवडणूक अशा एकूण दहा जागांवर निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट तसेच महाविकास आघाडीकडून शिवसेने ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. एकूण दहा जागांसाठी दहा उमेदवार आल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होणार आहे. यासोबतच तीन अपक्षांनी अर्ज दाखल केला होता, मात्र त्यांच्याकडून आवश्यक दहा आमदारांची सूचक सही न आल्याने त्यांचे अर्ज बाद ठरले आहेत.
विधान परिषदेवरील 10 जागांसाठी केवळ 10 उमेदवार आल्याने आता निवडणूक बिनविरोध होणार आहे. कुठल्याही पक्षाने आपल्या संख्याबळानुसार अधिकचा उमेदवार न दिल्याने ही निवडणूक बिनविरोध होत आहे. भारतीय जनता पक्ष 6 उमेदवार, शिवसेना शिंदे गट 2 उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट 1 उमेदवार आणि मविआकडून शिवसेना ठाकरे गटाचा 1 उमेदवार, अशा एकूण 10 उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
भाजपचे उमेदवार –
१) सुनील कर्जतकर
२) माधवी नाईक
३) संजय भेंडे
४) विवेक कोल्हे
५) प्रमोद जठार
६) प्रज्ञा सातव
शिवसेना शिंदेंचे उमेदवार –
१) नीलम गोऱ्हे
२) बच्चू कडू
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट –
१) झिशान सिद्दीकी
शिवसेना ठाकरे गट –
१) अंबादास दानवे




