शनिवार २ मे रोजी मराठा मंदिर, अ. के. देसाई हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन


          शनिवार दिनांक 02 / 05 / 2026 रोजी मराठा मंदिर अ. के. देसाई हायस्कूल रत्नागिरी येथे शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी नऊ वाजता नाव नोंदणीने सदर मेळाव्याची सुरुवात झाल्यानंतर असा मी घडलो या कार्यक्रमामध्ये माजी विद्यार्थी व शिक्षकांची मनोगते व्यक्त होणार आहेत. दुपारच्या भोजनानंतर गप्पाटप्पा, मनोरंजक खेळ , माजी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध प्रकारे हा मेळावा संपन्न होणार आहे. तरी शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी शनिवार दिनांक 2 मे 2026 रोजी माजी विद्यार्थी मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. अंजली पिलणकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि माजी विद्यार्थी संघाचे सदस्य श्री.रणजीत सुवारे,श्री.सुदेश निवळकर,श्री.अभिजीत गोडबोले, श्री. योगेश कोरगावकर, श्री.आकाश परीट, श्री.प्रणित मेस्त्री,श्री.अक्षय पाखरे,श्री.अनिकेत जाधव,श्री.अच्युत गजबिये, आलीशा जाधव, रिया मांडवकर, शाकिब मुल्ला,श्री.सुशांत पवार,श्री.जीवन जाधव, श्री.प्रकाश पालकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button