
चालकाला धमकी दिल्याने आंबा व्यापार्याला मारहाण, चांदोर येथील घटना
आपल्या गाडीवरील चालकाला धमकी दिल्याच्या रागातून आंबा व्यापार्याला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना चांदोर येथे शनिवारी रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडली. रमेश बाबू भोजे (४९, रा. चांदोर, रत्नागिरी) असे मारहाणीत जखमी झालेल्याचे नाव आहे. प्रतीक खरात (२२, रा. सापुचेतळे ता. लांजा) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या संशयिताचे नाव आहे.
संशयित प्रतीक याने रमेश यांना फोन करुन माझ्या गाडीवरील चालकाला धमकी का दिल्ली अशी विचारणा केली. त्यावर रमेश यांनी आपण कोणत्याही प्रकारची धमकी दिली नसल्याचे सांगितले. यावर संशयित आरोपीने तक्रारदाराना शिवीगाळ केली. या प्रकाराबाबत रमेश हे आरोपीला ओळखत असलेल्यांना भेटण्यासाठी सापुचेतळे येथे जात होते. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास आरोपी याने रमेश याची गाडी अडविली. तसेच त्यांना गाडीतून बाहेर खेचून लाकडी दांडक्याने मारहाण केली, अशी तक्रार रमेश भोजे यांनी पूर्णगड पोलीस ठाण्यात दाखल केली.www.konkantoday.com




