
जिल्ह्यातील ६०६ शाळांमध्ये इयत्ता सहावी आणि सातवीच्या दोन वर्गासाठी केवळ एकच शिक्षक
राज्य शासनाच्या नवीन पटसंख्या आणि शिक्षक धोरणानुसार जिल्हा परिषदेने तयार केलेली प्राथमिक शिक्षकांची नवी आकडेवारी समोर आली असून यामुळे जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. या नव्या धोरणामुळे जिल्ह्यातील ६०६ शाळांमध्ये इयत्ता सहावी आणि सातवीच्या दोन वर्गासाठी केवळ एकच पदवीधर शिक्षक उपलब्ध राहणार आहे. यामळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार्या शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याविषयी पालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला – जात आहे. २८ एप्रिल रोजी जिल्हा परिषद शिक्षण समितीची महत्वाची बैठक होत असून या पार्श्वभूमीवर शिक्षक संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
जिल्हा परिषदेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, जिल्ह्यात इयत्ता ६ वी ते ८ वी च्या गटात एकूण १०१८ पदवीधर पदे मंजूर आहेत. मात्र, नव्या संचमान्यतेच्या निकषानुसार विषयांची विभागणी करताना मोठा अन्याय झाल्याचे दिसून येत आहे.
या विभागणीनुसार ८५४ शाळापथ्ये विज्ञानाचा पहिला शिक्षक मिळेल. मात्र दुसर्या भाषेचा शिक्षक केवळ १५८ शाळांना मिळणार आहे. याचाच अर्थी असा की, उरलेल्या ६९६ शाळांमध्ये केवळ एकच पदवीधर शिक्षक (विज्ञान विषयक) असेल. सामाजिक शास्त्रासाठी तर जिल्ह्यात केवळ सहा शाळांमध्ये पदवीधर शिक्षक मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे बहुतांश शाळांमध्ये मुलांना केवळ ५० टक्के शिक्षक उपलब्ध होणार असून एकाच शिक्षकाला सर्व विषय शिकवण्याची कसरत करावी लागणार आहे.
www.konkantoday.com




