रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथे बेपत्ता झालेल्या प्रौढाचा मृतदेह आढळला.


रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा करवतीची येथील काजू बागेत बेपत्ता असलेल्या प्रौढाचा मृतदेह आढळून आला. उदय वासुदेव सागवेकर (५४, रा. शिरगांव -बाणखिंड रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. उदय हे सोमवारी सकाळी ११ वाजता आपली ज्युपिटर गाडी घेऊन घरातून बाहेर पडले होते. सायंकाळी उशिरापर्यंत ते घरी न आल्याने नातेवाईकांकडून शोधाशोध करण्यात आली. तसेच बेपत्ता झाल्याची खबर पोलिसांत देण्यात आली होती. मंगळवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास उदय यांचा मृतदेह हातखंबा करवतीची येथील काजू बागेत आढळून आला. अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button