रत्नागिरी शहराजवळ भगवती किल्ला येथे बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला


रत्नागिरी शहरातून तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह शहराजवळील भगवती किल्ला येथील शिवसृष्टीच्या पाठीमागील समुद्र किनारी आढळला. अमोल किड्ये (वय ३०, रा. मांडवी, रत्नागिरी) असे मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना आज (९ एप्रिल) सायंकाळी चारच्या सुमारास निदर्शनास आली.
किड्ये हा तीन दिवसांपासून आपल्या राहत्या घरातून निघून गेला होता. त्यानंतर गुरुवारी त्याचा मृतदेह भगवती किल्ला येथील शिवसृष्टीच्या पाठीमागील समुद्र किनारी रेलिंगच्या बाहेरील बाजूस समुद्र किनारी नागरिकांना आढळला.
अमोलची गाडी भगवतीबंदर येथे चावीसह उभी आहे. स्थानिक नागरिकांनी त्याचा मृतदेह समुद्रातून बाहेर रोपवेच्या आधारे काढला. उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button