
रत्नागिरी न.प.ची प्लॅस्टिकविरोधी मोहीम सुरूच, शहरात ३ दिवसात ९१ किलो ’प्लास्टिक’ पिशव्या जप्त
पर्यावरणाचा समतोल रोखण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने १ एप्रिलपासून प्लास्टिक विरोधी मोहिमेचा बडगा उगारला आहे. विशेष म्हणजे, शुक्रवारी सुट्टीचा दिवस असतानाही पालिकेच्या आरोग्य विभागाने आपली कारवाई थांबवली नाही. आरोग्य निरीक्षक संदेश कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गेल्या तीन दिवसात शहराच्या विविध भागांतून एकूण ९१ किलो प्लास्टिकचा साठा जप्त केला आहे. मोहिमेच्या पहिल्यात दिवशी २६ किलो, दुसर्या दिवशी ४५ किलो आणि शुक्रवारी तिसर्या दिवशी २० किलो प्लास्टिक पिशव्या हस्तगत करण्यात आल्या. सध्या केवळ जप्तीची कारवाई सुरू असली, तरी लवकरच नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कडक दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे संकेत संदेश कांबळे यांनी दिले आहेत. नगर परिषदेचे पथक सध्या मारुती मंदिर ते साळवी स्टॉप या वरच्या भागात बारकाईने तपासणी करत आहे. यामध्ये प्रामुख्याने कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक शीट, थर्माकोलच्या थाळ्या, कप, ग्लास, वाट्या, स्टो, चमचा आणि काटे अशा प्रतिबंधित वस्तू शोधून काढून त्या जागीच जप्त केल्या जात आहेत.
www.konkantoday.com




