
जि. प. ‘आदर्श शिक्षक’ व ‘आदर्श शाळा’ पुरस्कारपालकमंत्री डाॕ उदय सामंत यांच्या हस्ते सोमवारी वितरण
रत्नागिरी, दि. 9 ):- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने वर्ष २०२५-२६ मधील आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच वर्ष २०२४-२५ व २०२५-२६ मधील आदर्श शाळा पुरस्कार वितरण सोमवार १३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख उपस्थितीमध्ये गृह (शहरी), महसूल, ग्रामविकास व पंचायती राज, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम,
जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे राहणार आहेत.
खासदार नारायण राणे आणि सुनिल तटकरे, विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, प्रमोद जठार, अनिकेत तटकरे, विधानसभा आमदार भास्कर जाधव, शेखर निकम, किरण सामंत आणि नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे तसेच जिल्हाधिकारी मनुज जिंदल आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, जि.प. उपाध्यक्ष विलास चाळके, कृषी व पशुसंवर्धन सभापती महेश नाटेकर, समाजकल्याण सभापती सुयोग कांबळे, महिला व बालविकास सभापती मयुरी शिर्के आणि अति. उपमुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
शिक्षण क्षेत्रातील या मानाच्या पुरस्कार सोहळ्यास जिल्ह्यातील सर्व शिक्षणप्रेमी, शिक्षक, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ सभापती नंदकुमार मुरकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते, माध्यमिक शिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, शिक्षणाधिकारी (योजना) किरण लोहार यांनी केले आहे.




