
सिलिंडर टंचाईने हॉटेल उद्योग कोंडीत, पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रशासनाला आदेश
रत्नागिरी जिल्ह्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तीव्र तुत्वडा निर्माण झाल्याने हॉटेल व्यावसायिक मोठ्या संकटात सापडले आहेत. अनेक लहान हॉटेल्स बंद पडण्याच्या मार्गावर असून, काहींनी पर्याय म्हणून चुलीचा आधार घेतला आहे. मात्र मोठ्या हॉटेल्सना हा पर्याय शक्य नसल्याने काहींनी थेट हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी तातडीने जिल्हाधिकारी व संबंधित अधिकार्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बाबतीत त्यांनी प्रशासनाला वेळेवर उपाययोजना राबविण्याचे आदेश दिले.
ज्या हॉटेल व्यावसायिकांना शक्य आहे. त्यांना तातडीने ’महानगर गॅस’ पाईपलाईन जोडणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासाठी नगरपालिका प्रशासन आणि गॅस कंपनीच्या अधिकार्यांनी संयुक्तपणे सर्वेक्षण करून नोंदणी प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करावी, अस निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, गॅस सिलिंडरच्या वितरणात समन्वय राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी जीवन देसाई यांची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच, ज्या छोट्या हॉटेल व्यावसायिकांना एक सिलिंडर १५ ते २० दिवस पुरतो, अशांना सिलिंडर उपलब्ध झाल्यानंतर प्राधान्याने पुरवठा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या या तातडीच्या हस्तक्षेपामुळे अडचणीत सापडलेल्या हॉटेल व्यावसायिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.www.konkantoday.com



