
श्री देव गणपतीपुळे देवस्थानाच्यावतीने भाविकांसाठी महाप्रसादासोबत आता मोफत नाश्ता
इराण-इस्रायल युद्धाच्या छायेत व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा विस्कळीत झाल्याने प्रसिद्ध गणपतीपुळे पर्यटन केंद्रात मोठी खाद्यान्न समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संस्थान श्रीदेव गणपतीपुळे देवस्थानने १ एप्रिलपासून भाविकांसाठी दुपार व रात्रीच्या मोफत भोजनासोबतच सकाळी मोफत नाश्त्याची सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. नाश्त्यासाठी सकाळी ८ ते १० ही वेळ निश्चित करण्यात आली आहे. अनेक हॉटेल्स बंद असल्याने लांबून येणार्या पर्यटकांची आणि भाविकांची सकाळच्या नाश्त्यासाठी व जेवणासाठी मोठी वणवण होत आहे. भाविकांचे हे हाल लक्षात घेऊन देवस्थान पंचकमिटीने हा निर्णय घेतला आहे.www.konkantoday.com




