
महाराष्ट्रात इव्हेंट टुरिझमचा वाढता कल, पर्यटन आणि रोजगाराला मोठी चालना
महोत्सव, क्रीडा स्पर्धा आणि सास्कृतिक कार्यक्रमांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे महाराष्ट्रात ’इव्हेंट टुरिझम’चा मोठा बूम पाहायला मिळत असल्याचे एअरबीएनबीच्या ’अनलॉकिंग महाराष्ट्र इव्हेंट इकॉनॉमीः पॉवरिंग टुरिझम अँड लोकल कम्युनिटीज’ या अहवालातून स्पष्ट झाले आहे. या ट्रेंडमुळे राज्यात पर्यटनाची मागणी आणि पर्यटकांचा खर्च लक्षणीयरित्या वाढत असून, महाराष्ट्र देशातील कार्यक्रमकेंद्री प्रवासाचे प्रमुख केंद्र बनत आहे.
आयोजित मोठ्या राज्यात कार्यक्रमांचा पर्यटनावर थेट सकारात्मक परिणाम होत असल्याचे आकडेवारीतून दिसून येते. २०२३ मधील विश्वचषक सामन्यांच्या काळात महाराष्ट्रात राहाणार्या पर्यटकांच्या संख्येत ५० टक्क्यांची वाढ तासांच्या तारखांदरम्यान चेक-इनमध्ये तब्बल ७५ टक्के वाढ नोंदवली गेली. जानेवारी २०२५ मध्ये मुंबईतील कोल्डप्लेच्या कार्यक्रमादरम्यान बुकिंगमध्ये १०० टक्क्यांची वाढ झाली, तर पाहुण्यांची संख्या १७० टक्क्यांनी वाढली. लोलापलूझा इंडिया २०२६ सारख्या महोत्सवांमध्येही हा कल कायम राहिला असून मुंबईतील बुकिंगमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
तरुण पिढीमध्ये ’इव्हेंट बेस्ड ट्रॅव्हल’चा ट्रेंड वेगाने वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार प्रत्येक ट्रिपमागे सरासरी ५१ हजार रुपये खर्च केला जात असून, दहापैकी सहा प्रवासी त्यांच्या मासिक उत्पन्नाच्या २१ ते ४० टक्के रक्कम संगीत व कार्यक्रमांवर आधारित प्रवासासाठी खर्च करतात. विशेष म्हणजे, कॉन्सर्टच्या तिकिटावर खर्च केलेल्या प्रत्येक १००० रुपयांमागे अतिरिक्त १५०० ते २००० रुपये स्थानिक पर्यटन अर्थव्यवस्थेत निवास, वाहतूक आणि स्थानिक व्यवसायांमध्ये खर्च होतात.www.konkantoday.com




