
शासकीय संगणक लघुलेखन परीक्षाशुल्क प्रतिपूर्ती योजना अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 एप्रिल
रत्नागिरी, दि. 23 ) : माहे जानेवारी, 2026 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (जीसीसी- टीबीसी) लघुलेखन परीक्षेचा निकाल दिनांक १० मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांतील अमृतच्या लक्षित गटातील (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगूनथर, गुजराथी, ठाकूर, जाट, हिंदू नेपाली, भूमिहार, लोहाणा, कानबी) विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क प्रतिपूर्तीचा लाभ घेण्यासाठी अमृत संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mahaamrut.org.in/) ऑनलाईन पद्धतीने अर्ज दिनांक ३० एप्रिल पर्यंत मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्या माध्यमातून शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (जीसीसी- टीबीसी) लघुलेखन परीक्षा जून व डिसेंबर महिन्यात घेण्यात येतात. ऑनलाइन अर्जा सादर करताना गत आर्थिक वर्षाचे (सन २०२५-२६) अथवा पुढील आर्थिक वर्षासाठी (सन २०२६-२७) लागू असलेलेउत्पन्नाचे प्रमाणपत्र अथवा EWS प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्र (डोमासाइल सर्टिफिकेट), लक्षित गटाची जात नमूद असलेला शासकीय पुरावा (उदा. टी.सी/एल.सी/ शालेय निर्गम उतारा इ.), परीक्षा (माहे जानेवारी २०२६) उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, बँक खाते तपशीलासाठी बँकेचे पासबुक/रद्द केलेला धनादेश (रद्द केलेला चेक) याची स्पष्ट प्रत ही कागदपत्रे आवश्यक आहेत. तरी पात्र विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज सादर करण्याचे आवाहन महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) चे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे.




