
देसाई बंधू आंबेवाले यांनी तयार केलेली मँगो ड्रिंक, रॉ मँगो ड्रिंक आणि कोकम ड्रिंक ही कोकणी उत्पादनाची अमेरिकेत होणार निर्यात
रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते या नव्या उत्पादनाचा प्रारंभ
रत्नागिरी तालुक्यातील पावस येथील प्रसिद्ध आंबा बागायतदार देसाई बंधू आंबेवाले यांनी मँगो ड्रिंक, रॉ मँगो ड्रिंक आणि कोकम ड्रिंक ही नवीन कोकणी उत्पादने बाजारपेठेत आणली असून, या नव्या उत्पादनाचा प्रारंभ राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
देसाई बंधू आंबेवाले यांनी तयार केलेली ही उत्पादने अमेरिकेत निर्यात केली जाणार आहेत. तसेच देशातील बाजारपेठेत १ एप्रिल पासून उपलब्ध होणार आहेत.
पाली येथे रत्नागिरीचे पालकमंत्री ना. डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते या नव्या उत्पादनाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी आनंद देसाई , अमर देसाई , रोहन देसाई , सुदेश मयेकर आदी उपस्थित होते.




