फाटक हायस्कूलची विद्यार्थिनी स्पृहा भावे हिचा युवासेनेच्या वतीने गौरव

होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत निवड झाल्याबद्दल सत्कार

रत्नागिरी येथील फाटक हायस्कूलची इयत्ता सहावी मधील विद्यार्थिनी कुमारी स्पृहा भावे हिने ‘होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धे’च्या अंतिम फेरीत धडक मारली असून, रत्नागिरीतून निवड झालेली ती एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे. तिच्या या दैदिप्यमान यशाची दखल घेत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने पुष्पगुच्छ व भेटवस्तू देवून तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
फाटक हायस्कूलमध्ये आयोजित या कार्यक्रमात स्पृहाच्या यशाचे कौतुक करण्यात आले व तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी युवासेनेचे जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत, युवासेना तालुकाप्रमुख श्री. संदेश नरगुडे, शिवसेना शाखाप्रमुख श्री. प्रसाद रायंगणकर आणि युवासेना कार्यकर्ता कु.चैतन्य निंबाळकर हे उपस्थित होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. कीर सर, उपमुख्याध्यापक श्री. जोशी सर, पर्यवेक्षिका शेट्ये मॅडम, तसेच श्री. चवेकर सर, श्री. सावर्डेकर सर, श्री. आग्रे सर आणि जोशी मॅडम यांनी युवासेनेचे आभार मानले.
मुख्याध्यापकांनी स्पृहाच्या या यशाबद्दल समाधान व्यक्त केले, तर युवासेना जिल्हाप्रमुख श्री. प्रसाद सावंत यांनी रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी संघटना सदैव उभी असल्याचे सांगितले. स्पृहाच्या या यशामुळे शाळेसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात तिचे अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button