फेब्रुवारीत ४१ हजार ५२२ फुकटे प्रवासी


विनातिकीट कोकण रेल्वे प्रवास करणार्‍या फुकट्या प्रवाशांचे आता धाबे दणाणले आहेत. फेब्रुवारी महिन्यात कोकण रेल्वे प्रशासनाने राबवलेल्या तिकीट तपासणी मोहिमेत विनातिकीट प्रवास करणार्‍यांकडून तब्बल २ कोटी ४१ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. ’प्रवास करायचा तर तिकीट काढूनच’, असा स्पष्ट इशारा रेल्वेने या कारवाईतून दिला आहे.
कोकण रेल्वेने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात संपूर्ण मार्गावर ८७३ विशेष तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या. या धडक कारवाईत एकूण ४१ हजार ५२२ प्रवासी विनातिकीट किंवा चुकीच्या वर्गाचे तिकीट घेऊन प्रवास करताना प्रवाशांना आढळून आले. या प्रवाशांकडून रेल्वेचे मूळ भाडे आणि दंडापोटी तब्बल २ कोटी ४१ लाख रुपयांचा महसूल जमा करण आला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button