संपदा तळेकर यांचा शिवसेनेत प्रवेश

रत्नागिरी : नगरपालिकेच्या माजी नगरसेविका संपदा तळेकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा रविवारी (१५ मार्च) मांडवीतील गगनगिरी हॉल येथे झाला. याप्रसंगी नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, रत्नागिरी शहरप्रमुख बिपीन बंदरकर, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, महिला शहर प्रमुख स्पितल पावस्कर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदेश मयेकर, संजय साळवी, नगरसेवक बंटी कीर, राजीव कीर, नगरसेवक निवेदिता कळंबटे, नगरसेवक विजय खेडेकर श्रद्धा हळदणकर, वैभव खेडेकर, राकेश नागवेकर, मुन्ना चवंडे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button