
मुंबई मध्ये भाजपची महत्त्वपूर्ण बैठक विकास विषयांवर सकारात्मक चर्चा
भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी आमदार किरण सामंत, रत्नागिरी शहराध्यक्ष दादा ढेकणे, महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका वर्षा ढेकणे, तसेच भाजपा पक्षाचे सर्व नगरसेवक राजू तोडणकर सुप्रिया रसाळ संदीप सुर्वेआणि उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर पदाधिकारी सचिन करमरकर संदीप रसाळ उपस्थित होते.
रत्नागिरी नगरपालिका आणि शहराच्या विविध विकासकामांबाबत या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच नागरिकांच्या दैनंदिन समस्यांवर उपाययोजना करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी रत्नागिरीच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांच्या हिताला प्राधान्य देत आगामी काळात विविध विकासकामांना गती देण्याचे आश्वासन देण्यात आले.
ही बैठक शहराच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




