दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्मृती सभागृह

भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची संकल्पना

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नांतून येथील दी न्यू सोसायटीच्या सभागृहाला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी स्मृती सभागृह असे नामकरण करण्याचे संस्थेने ठरवले आहे.

दी न्यू एज्युकेशन सोसायटीच्या गुरुवर्य एम. एन. जोशी इंग्लिश मीडियम स्कूलच्या सांस्कृतिक सभागृहाला माजी पंतप्रधान, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचे नाव दिले जाणार आहे. शतक महोत्सव साजरा केलेल्या दी न्यू एज्युकेशन सोसायटीने येत्या मार्चअखेर नामकरण करण्याचे ठरवले आहे. भाजपा शहराध्यक्ष दादा ढेकणे व प्रमुख पदाधिकारी आणि संस्थेचे दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब परुळेकर व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत याचा निर्णय घेण्यात आला.

याप्रसंगी कार्याध्यक्ष सौ. दाक्षायणी बोपर्डीकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. या वेळी उपकार्याध्यक्ष शेखर शेट्ये, सचिव राजीव गोगटे, सहसचिव शेखर लेले, माजी सचिव दिलीप भातडे, भाजपा महिला जिल्हाध्यक्ष तथा नगरसेविका सौ. वर्षा ढेकणे, नगरसेविका सौ. सुप्रिया रसाळ, पदाधिकारी राजन पटवर्धन, मनोज पाटणकर, केतन कडू, श्री. बाष्टे, श्री. देसाई आदी उपस्थित होते. माजी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष व श्री. रवींद्र चव्हाण यांचे स्वीय सहाय्क अनिकेत पटवर्धन यांच्या माध्यमातून आणि दी न्यू एज्युकेशन सोसायटीचे सहसचिव शेखर लेले यांच्या विशेष प्रयत्नातून हा कार्यक्रम साकार होणार आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेबद्दल त्यांचे विशेष आभार अॅड. परुळेकर यांनी मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button