
बिले थकल्याने चिपळुणात यावर्षी टँकर ने पाणीपुरवठा रखडणार
गतवर्षी चिपळूण तालुक्यातील ९ गावांमधील १४ वाड्यांमध्ये उद्भवलेल्या टंचाईग्रस्तांची तहान भागवण्यासाठी एका खासगी टँकरद्वरे पाणीपुरवठा करण्यात आला होता. मात्र या टँकर मालकाला अनुदानाअभावी अद्याप बिल अदा न झाल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे. परिणामी यावर्षी टँकर शोधताना प्रशासनाला कसरत करावी लागणार असल्याने यावर्षी टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा रखडण्याची शक्यता आहे.
एकीकडे गतवर्षीची बिले रखडली असताना दुसरीकडे यावर्षी टँकरेने पाणीपुरवठा करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. रखडल्या बिलामुळे टैंकर मालकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात असल्याने यंदा टैंकर अभावी टंचाईग्रस्तांची तहान भागवण्यास विलंब होण्याची शक्यता आहे.
तालुका पाणी टंचाईमुक्त करण्यासाठी आजवर केलेल्या घोषणा पोकळ ठरल्या आहेत. त्यामुळे दरवर्षी फेब्रुवारी, मार्च महिना उजाडताच पाणी टंचाई निर्माण होत असल्याचे आजवरचे चित्र आहे. कडाक्याच्या उष्म्यात जलस्रोत रिकामे होत गेल्यानंतर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याच्या मागणीचे अर्ज टंचाईग्रस्तांकडून प्रशासनाकडे प्राप्त होत असतात.
पाणी टंचाईची पहिल्यांदा झळ दर्या-खोर्यातील धनगरवाड्यांना बसत | असते. त्यापाठोपाठ उष्म्याची दाहकता अधिकच वाढू लागल्यानंतर इतर गावांनाही भीषण टंचाईचा सामना करावा लागतो. अशा टंचाईग्रस्त गावाना दरवर्षी प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणी पुरवठा करून त्यांची तहान भागवली जाते.www.konkantoday.com




