दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र मागे कसा? निलेश राणे यांचा सरकारला घरचा आहेर!

मुंबई : देशात महाराष्ट्राचे सकल उत्पन्न पहिल्या क्रमांकाचे आहे मग दरडोई उत्पन्नात राज्य पाचव्या क्रमांकावर कसे. देशाच्या एकूण उत्पन्नाच्या तुलनेत महाराष्ट्र देशाला ३६ टक्के कर स्वरुपात देते. त्याबदल्यात महाराष्ट्राला एकूण उत्पन्नाच्या फक्त ६.४ टक्के निधी दिला जातो. हा निधी एक लाख नऊ हजार कोटी आहे. या उलट उत्तर प्रदेशाला केंद्र सरकार तीन लाख ६० हजार कोटी रुपये देत आहे. उत्पन्न वाढले म्हणजे राज्य सुधारले असे होत नाही, अशी टीका शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार निलेश राणे यांनी करुन सरकारला घरचा आहेर दिला.

सरकारने जमा आणि खर्चाचे आकडे आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचे कौतुक करताना राणे यांनी अर्थसंकल्पातील त्रुटींवर बोट ठेवले. राज्याचे सकल उत्पन्न ५१ लाख कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या उत्पन्नावर सरकारने कर्ज घेतले आहे. ते आता ११ लाख कोटी पेक्षा जास्त झाले आहे. जमा, खर्च, कर्ज याचा समतोल साधला गेला नाही. महसूली तूट ४० हजार कोटीच्या पुढे गेली आहे. या वित्तीय तूटीकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे.

१६ व्या वित्त आयोगात राज्यासाठी तरतूद करताना राज्याने आपले वजन वापरुन एक टक्का जरी वाढ करुन घेतली असती तर आज राज्याला जास्त निधी मिळाला असता. राज्याला इतके कर्ज घेण्याची वेळ आली नसती. उत्तर प्रदेशचा अर्थसंकल्प वरकढ आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक मदतीवर राज्य सर्वस्वी अवलंबून आहे. शेजारचे कर्नाटक राज्य स्वयंपूर्ण होत आहे. ते केवळ २५ टक्के केंद्रावर अवलंबून आहेत. राज्याचे उत्पन्न गेली पाच वर्षे पाच लाख कोटीनेच कसे वाढते. हा पॅर्टन कसा आला. राज्याने आर्थिक सुधारणा करण्याची गरज असल्याची अपेक्षा राणे यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button