वाघाला जेरबंद करणारी ‘वाघीण’; कुणालाच जमलं नाही, ते ‘ति’नं करून दाखवलं! वाघाशी दोन हात करणारी पहिली महिला डॉक्टर!!

नागपूर : मनात जिद्द असेल तर सर्व काही साध्य करता येते, जगही जिंकता येते. भारतातील पहिल्या ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ मधील डॉ. प्रियल चौरागडे या तरुण पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने करून दाखवले. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जंगलातील वाघाला tranquilize करून जेरबंद करणारी ती पहिली महिला डॉक्टर ठरली.

वाघाला जेरबंद करण्याची मागणी का?

नागपूर जिल्ह्यातील पारशिवणी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाघाचा धुमाकूळ सुरू होता. या वाघाने माणूस मारला नसला तरीही गावकऱ्यांची जनावरे तो फस्त करत होता. त्यामुळे या वाघाला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली. त्याचा फायदा घेत या परिसरातील राजकीय नेतृत्वाने वाघ जेरबंद करण्यासाठी वनखात्यावर दबाव टाकला.

अनेकांनी केले प्रयत्न

जनावरे फस्त करणाऱ्या पारशीवणी परिसरातील या वाघाला पकडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. गोरेवाडाची चमू, भंडाऱ्यातील स्वतःला तज्ञ समजणारा पोलीस दलातील शूटर, आणि वाघाला जेरबंद करण्यात स्वतःला तज्ञ समजणारे अनेक पशुवैद्यकीय अधिकारी व शूटर यांनी प्रयत्न केले, पण एकालाही यात यश आले नाही.

वाघाला जेरबंद करणारी ‘वाघीण’; कुणालाच जमलं नाही, ते ‘ति’नं करून दाखवलं! वाघाशी दोन हात करणारी पहिली महिला डॉक्टर…
नागपूर : मनात जिद्द असेल तर सर्व काही साध्य करता येते, जगही जिंकता येते. भारतातील पहिल्या “ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ मधील डॉ. प्रियल…

ट्रान्झिटच्या चमूचे यश

भारतातील पहिले ‘ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर’ दहा वर्षांपूर्वी नागपुरात तयार झाले. मात्र, वनखात्याचे केंद्र असूनही वनखात्यानेच कायम या केंद्राला दुजाभावाची वागणूक दिली. तरीही विपरीत परिस्थितीत या केंद्राच्या चमूने प्रत्येक रेस्क्यू ऑपरेशन आणि वन्यप्राण्यांवरचे उपचार यशस्वी करून दाखवले. दीड वर्षांपूर्वी या टीममध्ये पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियल खोब्रागडे यांचा समावेश झाला.

डॉ. प्रियलचा प्रवास

शिकण्याची आवड असेल तर यशाला गवसणी घालता येते. कधीही वाघ, बिबट हाताळलेला नसतांना डॉ. प्रियलने जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर काम करायला सुरुवात केली. वन्यप्राण्यांवरील उपचारांपासून तर शस्त्रक्रिया तिने वरिष्ठ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली केल्या. आता तर याच वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ती गर्भवती वाघीण आणि गर्भवती मादी बिबट्याची जबाबदारी सांभाळत आहे.

तिचा आत्मविश्वास जिंकला

पारशिवणीच्या वाघापुढे सर्वांनी हात टेकले असताना तिने हा वाघ मी जेरबंद करणारच असा निर्धार केला. खात्यातील अधिकाऱ्यांनी तिच्यावर विश्वास दाखवला नसला तरी तिला मुलीसमान मानणारे कुंदन हाते यांनी तिच्यावर विश्वास दाखवला. तब्येत बरी नसतानाही ती या वाघाला जेरबंद करण्यासाठी ट्रान्झिट च्या चमुसोबत जंगलात गेली. आणि महिला दिनाच्या पूर्व संध्येला जंगलात जाऊन वाघाला जेरबंद करणारी ती पहिली महिला पशुवैद्यकीय अधिकारी ठरली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button