दापोली तालुक्यातील करंजाणी येथे एका युवकाचे पैशाच्या देवघेवीवरून जबरदस्तीने मोटारीत बसवून अपहरण


दापोली तालुक्यातील करंजाणी येथे बसस्टॉपवर एका युवकाला पैशाच्या देवघेवीवरून जबरदस्तीने मोटारीत बसवून अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या प्रकरणी दापोली पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गौराबाई बसवराज पवार (वय ५०, रा. करंजाणी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा किरण बसवराज पवार (वय ३०) याचे संशयितांनी अपहरण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ५ फेब्रुवारी २०२६ ला दुपारी करंजाणी बसथांब्यावर किरण पवार उभा असताना संशयित शब्बीर मांडलेकर(वय ६०) व त्याच्या सोबत जिशान शब्बीर मांडलेकर (२८), सुबान शब्बीर मांडलेकर (२१) आणि सरजीन लियाकत मांडलेकर ( सर्व रा. म्हाप्रळ, ता. मंडणगड) आणि अन्य तिघेजण तिथे आले. त्यांनी तू पैसे दिले नाहीस तर तुला मारून टाकू, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी किरण पवार याला जबरदस्तीने मोटारीतून बसवून पैशांची मागणी करून मारहाण केली. तसेच त्याला म्हाप्रळ येथे घरी नेऊन ठेवले. याबाबत किरणच्या आईने पोलिसात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी म्हाप्रळ येथे जाऊन त्याची सुटका केली. तसेच चार संशयितांनाही अटक करून गुन्हा दाखल केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button