रत्नागिरी शहरातील मिर्‍या येथील एकावर मिरकरवाडा येथे तीक्ष्ण हत्याराने वार करण्याची घटना, इसम जखमी


रत्नागिरी शहरानजिकच्या मिर्‍या येथील राहणारे जयेंद्र नार्वेकर यांच्यावर आज सकाळी मिरकरवाडा येथे वादामधून काही लोकांनी तीक्ष्ण हत्याराने वार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार मिरकरवाडा येथे घडला. यातील जखमी झालेले जयेंद्र नार्वेकर (वय ६०) हे व्यवसायाने मच्छिमार असल्याचे कळते. मात्र या हल्ल्यामागे शिमगोत्सवात झालेल्या वादावरून हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेवून जखमी नार्वेकर यांना शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button