
भाजपची जंबो जिल्हा कार्यकारिणी जाहीर,
जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव : नवी टीम, जुन्या-नव्यांचा समावेश
भारतीय जनता पार्टीच्या (भाजपा) रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशांत यादव यांनी आपल्या नूतन जिल्हा कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या हिरवा कंदील निवडीला दाखवल्यानंतर यादव यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली.
पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी काळातील निवडणुकांचे आव्हान पेलण्यासाठी अनुभवी आणि तरुण चेहऱ्यांचा समतोल या कार्यकारिणीत साधण्यात आला आहे. या नवीन कार्यकारिणीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून प्रशांत यादव (चिपळूण) धुरा सांभाळणार आहेत. त्यांच्या सोबतीने
उपाध्यक्ष म्हणून प्रमोद अधटराव (संगमेश्वर), संदीप सुर्वे (रत्नागिरी), संगीता जाधव (संगमेश्वर), बळीराम मोरे (चिपळूण), स्नेहा मेस्त्री (चिपळूण), चंद्रकांत मांडवकर (संगमेश्वर), भास्कर सुतार विकास सावंत (राजापूर), (रत्नागिरी), सुहास आटलेकर (रत्नागिरी) आणि शीतल पटेल (राजापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनात्मक कामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सरचिटणीस पदाची जबाबदारी ओंकार फडके (रत्नागिरी), स्वानंद रानडे (चिपळूण), अभिजित गुरव (राजापूर) आणि सुप्रिया उतेकर (चिपळूण) यांच्यावर सोपवण्यात आली आहे. चिटणीस म्हणून राजन पटवर्धन (रत्नागिरी), नीलेश भुरवणे (संगमेश्वर), योगेश शिर्के (चिपळूण), मनोज पाटणकर (रत्नागिरी), नयना पवार (चिपळूण), अनिल सावर्डेकर (चिपळूण), समीर टाकळे (चिपळूण), समिरा सुर्वे (लांजा दक्षिण), अपेक्षा दाभोळकर (लांजा उत्तर) आणि अभिनव भुरण (चिपळूण) यांची निवड झाली आहे.
तसेच, जिल्ह्याच्या कोषाध्यक्षपदी मकरंद ऊर्फ आशिष खातू (चिपळूण) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणे यांच्यासह माजी आमदार विनय नातू, प्रमोद जठार, माजी युवा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, दीपक पटवर्धन, विलास पाटणे यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश आहे.
याबाबत प्रशांत यादव यांनी विश्वास व्यक्त केला की, नवीन कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करून जिल्ह्यात पक्ष संघटना वाढवण्यासाठी अथक परिश्रम करतील. या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.



