स्वच्छता हा संस्कार बनविण्यासाठी डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने रत्नागिरी व देवरुख शहरांमध्ये स्वच्छता अभियान

रत्नागिरी : डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीने महाराष्ट्र भूषण तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी तथा नारायण विष्णू धर्माधिकारी यांच्या जन्मदिन दिनानिमित्ताने रत्नागिरी शहर व देवरुख शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

पद्मभूषण डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. श्री सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने समाज व राष्ट्र स्वास्थ्यासाठी स्वच्छता सर्वार्थाने महत्त्वाची आहे. या स्वच्छता अभियानातून नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्यासाठी प्रेरित व्हावे. हा मुख्य उद्देश असून, श्रमप्रतिष्ठेतूनच राष्ट्र आणि समाज उभारणीचे कार्य होणार आहे. स्वच्छता हा आपल्या प्रत्येक नागरिकांचा संस्कार बनावा. यासाठीच डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीच स्वच्छता अभियान घेण्यात येते.

एक मार्च तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्ताचे अवचित्य साधून सर्व महाराष्ट्रामध्ये व्यापक अर्थाने स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले. त्याचाच भाग म्हणून रत्नागिरी व देवरुख शहरांमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले रत्नागिरी व देवरुख शहर बाजारपेठ अंतर्गत रस्ते स्वच्छ करण्यात आले. रत्नागिरी शहरांमध्ये 1291 किलोग्रॅम ओला कचरा व 4811 किलोग्रॅम सुका कचरा तसेच देवरुख मध्ये 450 किलोग्रॅम ओला कचरा व 1200 किलोग्राम सुका कचरा गोळा करण्यात आला. या स्वच्छता अभियानामध्ये 738 श्रीसदस्यांनी सहभाग घेतला होता.

या स्वच्छता अभियानामध्ये रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ शिल्पा सुर्वे, नगरसेवक श्री नितीन जाधव, श्री राजू तोडणकर, श्री राकेश नागवेकर, सौ. स्मितल पावस्कर यांनी सहभाग घेतला होता.

रत्नागिरी शहरामध्ये व्यापकपणे घेतलेल्या स्वच्छता अभियानाबद्दल बोलताना रत्नागिरीच्या नगराध्यक्ष सौ शिल्पा सुर्वे म्हणाल्या की डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान च्या वतीने नेहमीच रत्नागिरी शहरांमध्ये विविध उपक्रम राबवले जातात आज रत्नागिरी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात नियोजनबद्ध स्वच्छता अभियान राबविण्यात आले आणि रत्नागिरी शहरातील रस्ते स्वच्छ बनले आहेत त्याबद्दल मी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. या स्तुत्य उपक्रमाबद्दल रत्नागिरी व देवरुख शहरांतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button