नाटे पोलिसांची गुटख्यावर मोठी कारवाई

७.९३ लाखांचा मुद्देमाल जप्त : एकजण ताब्यात

राजापूर : शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या गस्तीदरम्यान नाटे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यात विमल पान मसाला आणि प्रतिबंधित सुगंधी तंबाखूचा मोठ्या प्रमाणावर साठा आढळला असून, या कारवाईत वाहन आणि गुटख्यासह एकूण ७ लाख ९३ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२६ फेब्रुवारी रोजी सागेरी नाटे पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी धारतळे ते नाटे जाणाऱ्या सागरी महामार्गावर पेट्रोलिंग करत होते. यावेळी धाऊलवल्ली फाट्याजवळ समोरून येणारी युंदाई व्हेन्यू (क्र. एमएच-०८- बीबी- ३३०३) पोलिसांना संशयास्पद वाटली. पोलिसांनी गाडी थांबवून तपासणी केली असता, गाडीत कापडी पिशव्यांमध्ये विमल पान मसाला आणि तंबाखूचे पाकीट लपवून ठेवल्याचे उघड झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button