हापूस आंब्यावर यंदा निसर्गाची वक्रदृष्टी, किनारपट्टीवरील बागायतदार हवालदिल


कोकणचा राजा मानला जाणार्‍या हापूस आंब्यावर यंदा निसर्गाची वक्रदृष्टी पडली असून, रत्नागिरीसह संपूर्ण किनारपट्टीवर बागायतदार हवालदिल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोकणातील हवामानात होणारे अनपेक्षित बदल कधी दाट धुके, कधी कडक ऊन तर कधी अवकाळी पाऊस यामुळे आंब्याच्या मोहोरावर बुरशीजन्य रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. आंबा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांत हीच भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. विशेषतः रत्नागिरीतील नाचणे सारख्या भागात बागांमधील मोहोर अक्षरशः काळा पडला आहे. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला पहिल्या टप्प्यात मोहोर अपेक्षेप्रमाणे आलाच नव्हता. त्यानंतर मोठ्या आशेने दुसर्‍या टप्प्यातील मोहोराची प्रतीक्षा शेतकर्‍यांनाहोती. मात्रआता हा मोहोरही बुरशीमुळे करपून गेल्याचे बागायतदारांच्या चिंतेत भरपडली आहे. सातत्याने बदलणार्‍या हवामानामुळे रोगाचा प्रादुर्भाव इतका वाढला आहे की  अनेक ठिकाणी मोहोर पूर्णपणे गळून पडत आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button