सूड घेण्याच्या उद्देशाने खुनाचा कट रचल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा


चिपळूण तालुक्यातील नागावे येथील ग्रामदेवता श्री सुकाई देवी मंदिरासमोर बेकायदेशीर बांधलेला चौथरा काढल्याच्या रागातून माहिती अधिकारात विचारलेल्या माहितीचा सूड घेण्याच्या उद्देशाने खुनाचा कट रचल्याप्रकरणी सहा जणांवर अलोरे-शिरगांव पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
सुरेश राजाराम पालांडे, सुचिंद चंद्रकांत पालांडे, घनश्याम राजाराम पालांडे, चंद्रकांत शंकर पालांडे, शिवाजी दत्ताराम पालांडे, श्रीकांत शंकर पालांडे (सर्व रा. नागावे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची फिर्याद प्रकाश बाबू चिपळूणकर (५८, नागावे) यांनी दिली.
पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार पालांडे कुटुंबियांनी ग्रामदेवता श्री सुकाई देवी मंदिरासमोर अंत्यसंस्कार करण्याकरिता मंदिरासमोर बेकायदेशीर चौथरा बांधला होता. त्यामुळे येथील ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्याने हा चौथरा पालांडे कुटुंबाने स्वतःहून काढावा यासाठी नागावे ग्रामपंचायतीने नोटीस दिली. मात्र त्यांनी चौथरा न काढल्याने २३ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी हा चौथरा काढला. चौथरा काढून टाकण्याच्या कारवाईत सामील नसतानाही आपली बदनामी व्हावी या उद्देशाने संशयितांकडून पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला असे चिपळूणकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button