
अश्लील भाषा व शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून र्निदोष मुक्तता
रत्नागिरी : अश्लील भाषा व शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपातून दोघांची र्निदोष मुक्तता करण्यात आली.
याबाबत वकिलांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील प-याची आळी, विठ्ठल मंदिराच्या मागे राहणारे रणधिर विजय शेट्ये व मेधा विजय शेट्ये यांनी फिर्यादीस अश्लील भाषा वापरुन, तसेच अश्लील शिवीगाळ करुन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याबाबतची तक्रार फिर्यादीने दिनांक ८ डिसेंबर २०१९ रोजी दिली होती. त्यानुसार त्यांचे विरुध्द पोलिसांनी भा. दं. वि. कलम ५०९, २९४, ३५२, ५०६ व ३४ नुसार गुन्हा दाखल केला होता. सदर केसचे कामकाज मे. चिफ ज्युडीशियल मॅजिस्ट्रेट साहेब रत्नागिरी यांचे कोर्टात चालले.
सरकार पक्षाच्यावतीने सदर केसमध्ये चार साक्षीदार तपासण्यात आले. त्यांचा उलटतपास आरोपींच्या वतीने अॅड. संदिप तुकाराम ढवळ यांनी केला. उलट तपासामध्ये महत्वाच्या कबुली साक्षीदारांकडून घेण्यात आल्या होत्या. आरोपींच्या वतीने करण्यात आलेला युक्तीवाद व केस लॉ विचारात घेऊन मे. चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट यांनी आरोपींची भा. दं. वि. कलम ५०९, २९४, ३५२, ५०६ व ३४ या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. आरोपींच्या वतीने अॅड. संदिप ढवळ, अॅड. अमित सोलकर, अॅड. पंकज बाणे, अॅड. शैलेश नावले व अॅड. शुभम आयरे यांनी कामकाज पाहिले.




