
रत्नागिरी येथे श्रीदेव भैरी देवस्थानची शिमगोत्सवासाठी रविवारी वार्षिक सभा
रत्नागिरी येथील ग्रामदैवत श्रीदेव भैरी देवस्थानचा वार्षिक शिमगोत्सव यंदा सोमवार, दिनांक ०२ मार्च २०२६ पासून सुरू होत आहे. या उत्सवाचे नेटके नियोजन आणि कार्यक्रम निश्चित करण्यासाठी देवस्थानची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार, दि.२२ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आली आहे.
ही सभा सकाळी १०.०० वाजता श्रीदेव भैरी मंदिरामध्ये संपन्न होणार आहे. या सभेमध्ये उत्सवाचे स्वरूप, पालखी सोहळा, विधी आणि इतर नियोजनाबाबत चर्चा करून कार्यक्रम ठरवण्यात येणार आहे.
या सभेला बारा वाड्यांतील सर्व मानकरी, गावकरी, देवस्थानचे ट्रस्टी, गुरव मंडळी आणि ग्रामस्थ बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन श्रीदेव भैरी देवस्थान ट्रस्ट, झाडगाव यांच्या वतीने अध्यक्षांनी केले आहे.




