
मांडवी एक्स्प्रेसचा ’लेटमार्क’ सहाव्या दिवशीही कायम
कोकण मार्गावर धावणार्या सीएसएमटी मुंबई-मडगाव मांडवी एक्स्प्रेसचा लेटमार्क ६ व्या दिवशीही कायम राहिला. बुधवारीही एक्स्प्रेस तब्बल ४ तास उशिरा सुटल्याने प्रवाशांचा त्या-त्या स्थानकात खोळंबा झाला. एक्स्प्रेसच्या विस्कळीत वेळापत्रकाचा प्रवाशांना फटका बसत आहे. बुधवारी निजामुद्दीन-एर्नाकुलम मंगला एक्स्प्रेस ३ तास १० मिनिटे उशिराने धावली.
भावसागर-कोच्युवेली एक्स्प्रेस २ तास १५ मिनिटे, तर दादर-तिरुनेलवेली एक्स्प्रेस २ तास ३० मिनिटे विलंबाने मार्गस्थ झाली. बांद्रा-मडगाव एक्सप्रेस १ तास १५ मिनिटे तर दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस १ तास उशिराने पोहोचली.
www.konkantoday.com




