आर्ट सर्कल फाउंडेशन आयोजित दोन दिवसीय नाट्य उत्सव

दिनांक 7 आणि 8 फेब्रुवारी या दोन दिवसांमध्ये रात्री 9.30 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहामध्ये दोन नाटकांचे सादरीकरण होणार आहे. दिनांक 7 रोजी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ ललित कला केंद्र निर्मित ‘इथेच टाका तंबू’ आणि 8 रोजी सोशल नेटवर्किंग फोरम आणि सपान, नाशिक निर्मित ‘तो राजहंस एक’.

या दोन्ही नाटकांच्या निमित्ताने तरुण लोकप्रिय कलाकारांची मांदियाळी रत्नागिरीत येत आहे. आई कुठे काय करते या मालिकेद्वारे घराघरात पोहोचलेला गुणी अभिनेता ओंकार गोवर्धन ‘ इथेच टाका तंबू ‘ या नाटकात प्रमुख भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेत नकारात्मक छटा असलेली भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी कासारदेखील या नाटकात मुख्य भूमिकेत आहे. तुला पाहते रे या मालिकेतून झेंडे च्या भूमिकेत दिसलेले ज्येष्ठ अभिनेते उमेश जगताप आणि सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसलेले अमेय बर्वे अशी या नाटकाची तगडी स्टारकास्ट आहे.

तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 रोजी तो राजहंस एक नाटकाच्या निमित्ताने प्राजक्त देशमुख याला अभिनेता म्हणून रंगमंचावर पाहण्याची संधी मिळणार आहे. त्याच्या जोडीला आहे माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील राधिका अर्थात अनिता दाते!

देवबाभळीसारख्या जबरदस्त नाटकाने प्राजक्त यांनी आपली लेखणी सिद्ध केली आहे. जितकी सशक्त त्यांची लेखणी आहे तितकाच सशक्त अभिनय ‘.. राजहंस..’ मधून आपल्याला पाहायला मिळणार आहे.

या सर्वांमधील एक महत्त्वाचा दुवा म्हणजे रंगभूमी! या दोन्ही नाटकातले सर्व कलाकार मराठी रंगभूमीशी नाळ जोडलेले आहे. गेली अनेक वर्ष विविध प्रयोग ते करत आहेत. दैनंदिन मालिकांमुळे ही सर्व मंडळी घराघरात पोहोचली आहेत.

या दोन्ही नाटकांचे लेखक दत्ता पाटील आणि सचिन शिंदे हे रंगभूमीवरील प्रयोगशील कलावंत म्हणून ओळखले जातात. आजवर अत्यंत संवेदनशील विषयांना त्यांनी रंगभूमीवर आणले आहेत.
या दोन्ही नाटकांच्या निमित्ताने प्रेक्षकांना अप्रतिम नाट्यानुभव मिळणार आहे. सभासदांना ही नाटके विनामूल्य पाहता येणार आहेत तर अन्य सर्वांसाठी अतिशय अल्प दरात देणगी मूल्य प्रवेशिका उपलब्ध आहेत. बैठक व्यवस्था प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button