
सीएसएमटी येथील फलाटाच्या कामामुळे ’तेजस’ २५ एप्रिलपर्यंत दादरपर्यंत
सीएसएमटी येथील फलाट क्रमांक १६ आणि १७ वरील सध्याच्या वाहतूक आणि वीज पुरवठ्याच्या कामामुळे मध्य रेल्वेने दादर आणि ठाणे स्थानकांवर २५ एप्रिलपर्यंत गाड्यांच्या मुक्कामात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार २२१२० क्रमांकाची मडगाव-सीएसएमटी मुंबई तेजस एक्स्प्रेस २५ एप्रिलपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावेल. १२१३४ क्रमांकाची मंगळूर-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेसही २५ एप्रिलपर्यंत ठाणे स्थानकापर्यंतच धावेल. या बदलामुळे प्रवाशांना इच्छितस्थळ गाठताना यातायात करावी लागणार आहे.
www.konkantoday.com




