रत्नागिरीच्या मातीत रोजगार मिळणार, ’सी-वर्ल्ड, ग्लोबल व्हिलेज’ ने होणार कायापालट : उदय सामंत


रत्नागिरीच्या मातीत रोजगाराच्या अशा संधी निर्माण करू की इथल्या तरुणांना चाकरीसाठी मुंबईची वाट धरावी लागणार नाही. रत्नागिरीत परदेशातील ’ग्लोबल व्हिलेज’च्या धर्तीवर भव्य प्रकल्प आणि ’सी-वर्ल्ड’ची निर्मिती करून पर्यटनातून आर्थिक क्रांती घडवण्याचा मानस आहे. या प्रकल्पांच्या माध्यमातून रत्नागिरीला जागतिक पर्यटनाच्या नकाशावर नेण्याचा निर्धार पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे.
साळवीस्टॉप येथे जि.प. आणि पं.स. उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या महायुतीच्या सभेत सामंत यांनी विरोधकांचा समाचार घेतला. त्यावेळी पालकमंत्री सामंत यांनी जिल्ह्याच्या विकासाचा नवा आणि रोडमॅप मांडला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पायगुण रत्नागिरीसाठी भाग्यवान ठरला असल्याचे सामंत म्हणाले. गेल्या साडेतीन वर्षांत जिल्ह्याला अभूतपूर्व निधी मिळाला आहे. शैक्षणिक, प्रशासकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात कायापालट झाला आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, संस्कृत विद्यापीठाचे उपकेंद्र आणि रतन टाटा कौशल्य केंद्राच्या माध्यमातून शिक्षणाचे माहेरघर घडवले जात आहे. यासोबतच जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय आणि पंचायत समितीच्या देखण्या इमारती जिल्ह्याच्या वैभवात भर घालत असल्याचे सामंत यांनी सांगितले. जिल्ह्यातील इतर ठिकाणी होणार्‍या उद्योगांमुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. येत्या काळामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते या उद्योगांचे उदघाटन होईल. या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत महायुतीला भरघोस मतानी विजयी करण्याचे आवाहन पालकमंत्री सामंत यांनी केले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button