
जगबुडी नदीपात्रातील उपसलेला गाळ भरणे ’पाटबंधारे’च्या जागेत
जगबुडी नदीपात्रातील गाळ उपसण्यासाठी तैनात करण्यात आलेल्या दोन पोकलेनच्या सहाय्याने गाळ उपसा प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. जलसंपदा विभागामार्फत नदीपात्रातून उपसलेला गाळ तहसीलदार सुधीर सोनावणे यांनी सूचित केलेल्या भरणे पाटबंधारे शासकीय वसाहतीच्या मोकळ्या शासकीय जागेत टाकण्यात येत आहे. याशिवाय नगर प्रशासनाने सूचवलेल्या सुखतळे येथेही गाळ टाकण्यात येत आहे.
पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, कनिष्ठ अभियंता हेमंत ढवण, बळवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गाळ उपसा प्रक्रियेने वेग घेतला आहे. जानेवारी महिन्यापासून जगबुडी नदीपात्रातून गाळ उपसण्यात येत आहे.www.konkantoday.com




