
मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ एस.टी. स्टॉपजवळ कारची धडक; वृद्ध जखमी
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ एस.टी. स्टॉपजवळ कारची धडक बसून एक वृद्ध गंभीर जखमी झाला आहे. तानाजी गोपाळ बेटकर असे वृद्धाचे नाव आहे. रविवारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास शेनवडे बेटकरवाडी येथील तानाजी गोपाळ बेटकर (७६) हे एस. टी. बसमधून उतरून पायी महामार्ग ओलांडत कडवई बाजूकडे जात असताना होंडा कंपनीच्या कार (क्रमांक एमएच ०१ सीजे ४५८१) ने त्यांना धडक दिली. कारचालकाने निष्काळजीपणे, भरधाव वेगात वाहन चालवल्याने ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या अपघातात तानाजी बेटकर यांना लहान-मोठ्या दुखापती झाल्या असून वाहनाचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी एकनाथ रंगा बेटकर (५६, रा. शेनवडे बेटकरवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
www.konkantoday.com




