
मिर्या-नागपूर महामार्ग अद्यापही अपूर्णावस्थेत मात्र महामार्गावर दिशादर्शक फलक झळकले
बहुचर्चित मिर्या-नागपूर महामार्गाचे काम मागील दोन वर्षापासून करण्यात येत आहे. अद्याप हे काम पूर्ण झाले नसतानाही कंत्राटदाराकडून दिशादर्शक फलक झळकवण्यात आले आहेत, ज्या रस्त्याने वाहने जाऊ शकत नाहीत, अशा ठिकाणी नेमके कुणासाठी हे दिशादर्शक फलक बसविण्यात आले आहेत. असा असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. मुंबई-गोवा महामार्गाबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यात मिर्या-नागपूर महामार्गाचे काम सुरू करण्यात आले आहे. मिर्या-नागपूर महामार्ग रत्नागिरी-कोल्हापूर मार्ग जोडणार असल्याने या मार्गाला महत्व प्राप्त झाले आहे. मात्र अद्याप या महामार्गावर काम सुरू असल्याने वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. काही ठिकाणी डायव्हर्जनचे बोर्ड वाहनचालकांना दिसत नसल्याने अपघात घडल्याच्या घटना घडत आहेत. याकडे लक्ष देण्याएवजी अपूर्ण अवस्थेत असलेल्या ठिकाणी मोठे दिशा दर्शक फलक लावण्यात आले आहेत. याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.www.konkantoday.com




